महानायकाने मागितली अखेर मुलीची माफी

महानायक अमिताभ बच्चन यांनी आलेल्या एका मुलीची माफी मागितली आहे. अमिताभ बच्चन यांची मोठी चाहती असलेली ही मुलगी मुंबईत आल्यावर अमिताभ यांची भेट न झाल्याने नाराज झाली. मात्र, तिच्या नाराजीची बिग बींनी दखल घेऊन तिची ट्विटरवरुन माफीही मागितली. ही मुलगी अपंग असल्याने कायम व्हिलचेअरवर असते. 

Updated: Nov 10, 2015, 12:10 AM IST
महानायकाने मागितली अखेर मुलीची माफी title=

मुंबई : महानायक अमिताभ बच्चन यांनी आलेल्या एका मुलीची माफी मागितली आहे. अमिताभ बच्चन यांची मोठी चाहती असलेली ही मुलगी मुंबईत आल्यावर अमिताभ यांची भेट न झाल्याने नाराज झाली. मात्र, तिच्या नाराजीची बिग बींनी दखल घेऊन तिची ट्विटरवरुन माफीही मागितली. ही मुलगी अपंग असल्याने कायम व्हिलचेअरवर असते. 

अमिताभ यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे, “प्रिय, प्रचंड गर्दीमुळे तुला भेटू शकलो नाही. मात्र, तुला भेटण्यासाठी मी नक्की प्रयत्न करेन.” मात्र, पुन्हा कधीतरी भेटण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचं बिग बींनी ट्विटरवरुन सांगितलं.

बिग बी अमिताभ बच्चन हे दर रविवारी मुंबईतील ‘जलसा’ बंगल्याबाहेर भेटण्यासाठी आलेल्या चाहत्यांना भेटतात. मात्र, बिग बी दक्षिण आफ्रिकेहून आलेल्या त्या मुलीला भेटू शकले नाहीत. त्यामुळे दक्षिण आफ्रिकेहून भेटण्यासाठी आलेली ती मुलगी नाराज झाली. 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.