मराठमोळी 'अंगुरी भाभी' कार्यक्रमातून बाहेर पडणार?

थोड्याच कालावधीत प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेली 'भाभीजी घर पर है' या छोट्या पडद्यावरील कार्यक्रमात दिसणारी साधी भोळी अंगुरी भाभी कदाचीत या कार्यक्रमातून बाहेर पडण्याची चिन्हं दिसत आहेत. 

Updated: Mar 5, 2016, 05:42 PM IST
मराठमोळी 'अंगुरी भाभी' कार्यक्रमातून बाहेर पडणार? title=

मुंबई : थोड्याच कालावधीत प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेली 'भाभीजी घर पर है' या छोट्या पडद्यावरील कार्यक्रमात दिसणारी साधी भोळी अंगुरी भाभी कदाचीत या कार्यक्रमातून बाहेर पडण्याची चिन्हं दिसत आहेत. 

मराठमोळी अभिनेत्री शिल्पा शिंदे ही अंगुरी भाभीच्या भूमिकेत दिसत आहे. मानधनावरून प्रोडक्शन टीमशी झालेल्या वादानंतर अंगुरी भागी या टीमच्या चिंतेचं कारण बनलीय. यामुळे, त्यांनी अंगुरी भाभीच्या भूमिकेसाठी नव्या अभिनेत्रीचा शोध सुरू केलाय. 

या मालिकेत शिल्पाचा 'सही पकडे है'चा अंदाजही अनेक प्रेक्षकांच्या तोंडी रेंगाळताना दिसतोय. त्यावरून या मालिकेची लोकप्रियताही दिसून येतेय. 

यावर, प्रतिक्रिया देताना शिल्पानं आपण आपलं मानधन वाढीबद्दल बोलल्याचं मान्य केलंय. घाबरवून गप्प बसावं आणि प्रोडक्शन टीमच्या सगळ्या अटी आपण गुमान मान्य कराव्यात यासाठी हे सगळं सुरू असल्याचं 'अंगुरी'फेम शिल्पानं म्हटलंय. 

त्यामुळे, आता अंगुरीच्या भूमिकेत शिल्पा भाव खाऊन जातेय की तिच्याऐवजी दुसरी अभिनेत्री येईल, हे लवकरच कळेल.