उर्मिला, प्रीतीनंतर आता सुष्मिताचा नंबर ?

बॉलीवूडमधल्या सेलिब्रिटीजचा आता ब्रेक अप्सचा सिझन संपून लग्नाचा सिझन सुरु झाल्याचं म्हणावं लागेल. 

Updated: Mar 5, 2016, 05:24 PM IST
उर्मिला, प्रीतीनंतर आता सुष्मिताचा नंबर ? title=

मुंबई: बॉलीवूडमधल्या सेलिब्रिटीजचा आता ब्रेक अप्सचा सिझन संपून लग्नाचा सिझन सुरु झाल्याचं म्हणावं लागेल. एकाच आठवड्यामध्ये अभिनेत्री प्रीती झिंटा आणि उर्मला मातोंडकर विवाह बंधनात अडकल्या. 

उर्मिला आणि प्रीतीनंतर आता सुष्मिता सेनही लग्न करु शकते, अशा चर्चा सुरु झाल्या आहेत. सुष्मिता आणि रितिक भासिनचे काही फोटोंबाबत सध्या बोललं जात आहे. गेल्या 2 वर्षांपासून सुष्मिता आणि रितीक एकमेकांना ओळखत आहेत.

पण या दोघांमध्ये भांडण झाल्याचा चर्चाही मध्ये झाल्या होत्या, पण आता पुन्हा या दोघांचे एकत्र फोटो काढण्यात आले आहेत. त्यामुळे आता बॉलीवूडच्या तिसऱ्या अभिनेत्रीचं आता लग्न होणार का ? हे पाहाणं औत्स्युक्याचं ठरणार आहे.