बाहुबली २ चा क्लायमॅक्स असणार सर्वात महागडा

बाहुबली चित्रपटानं बॉक्स ऑफिसवरचे सगळे रेकॉर्ड ब्रेक केले. यानंतर आता बाहुबली २ प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

Updated: Jun 16, 2016, 11:33 PM IST
बाहुबली २ चा क्लायमॅक्स असणार सर्वात महागडा title=

मुंबई : बाहुबली चित्रपटानं बॉक्स ऑफिसवरचे सगळे रेकॉर्ड ब्रेक केले. यानंतर आता बाहुबली २ प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या चित्रपटाच्या क्लायमॅक्सचं शूटिंग सध्या सुरु आहे. 

बाहुबलीचा हा क्लायमॅक्स सगळ्यात महागडा असल्याचं बोललं जात आहे. बाहुबली २ च्या या क्लायमॅक्ससाठी तब्बल ३० कोटी रुपये खर्च करण्याची तयारी बाहुबलीच्या निर्मात्यांनी दाखवली आहे. बाहुबलीच्या पहिल्या भागामध्ये युद्धाच्या सिनसाठी १५ कोटी रुपये खर्च करण्यात आला होता.