मुंबई : बाहुबली चित्रपटाचा हिरो प्रभास लग्न करतोय. काही दिवसांपूर्वीच त्याच्या घरातील एका सदस्याने प्रभासच्या लग्नाबाबात मोठा खुलासा केलाय. एका मुलाखती दरम्यान प्रभासचे काका कृष्णन राजू यांनी त्याच्या लग्नाबाबत माहिती दिली.
कृष्णन हे स्वत: दक्षिणेतील मोठे अभिनेते आहे. त्यांना मुलाखतीदरम्यान प्रभासच्या लग्नाबाबत विचारले असता या वर्षात त्याचे लग्न होऊ शकते असे त्यांनी सांगितले. तसेच प्रभाससाठी घरातले वधू शोधणार असल्याचेही ते म्हणाले.
गेल्या वर्षी प्रदर्शित झालेल्या बाहुबली चित्रपटाद्वारे जगभरात प्रभास सुपरस्टार झालाय. सध्या तो बाहुलबली-२च्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. मात्र लवकरच तो लग्न करणार आहे.