१४ एप्रिलला रिलीज होणार 'बाहुबली २'

२०१४मधील बॉक्स ऑफिसवर जबरदस्त यश मिळवलेले दोन चित्रपट म्हणजे सलमान खानचा बजरंगी भाईजान आणि राजामौली दिग्दर्शित बाहुबली. 

Updated: Mar 2, 2016, 01:45 PM IST
१४ एप्रिलला रिलीज होणार 'बाहुबली २' title=

मुंबई : २०१४मधील बॉक्स ऑफिसवर जबरदस्त यश मिळवलेले दोन चित्रपट म्हणजे सलमान खानचा बजरंगी भाईजान आणि राजामौली दिग्दर्शित बाहुबली. 

बाहुबली रिलीज होत असतानाच या चित्रपटाचा पुढील भाग लवकरच प्रदर्शित होणार असल्याचे सांगण्यात आले होते. त्यामुळे बाहुबलीचा दुसरा भाग कधी येतोय याची प्रतीक्षा चाहते करतायत.  

फिल्मी दुनियेतील चर्चेनुसार 'बाहुबली २' या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख निश्चित झाल्याचे समजतेय. पुढील वर्षी १४ एप्रिलला हा चित्रपट प्रदर्शित होत असल्याचे ट्विट तरण आदर्श यांनी केलेय. हा चित्रपटही बॉक्स ऑफिसवर मोठे यश मिळवेल अशी चर्चा आहे.