'बघतोस काय... मुजरा कर!'चा ट्रेलर रिलीज

छत्रपती शिवाजी महाराजांच्या गड किल्ल्यांची झालेली अवस्था त्यातच शिवस्मारकाचं राजकारण या विषयावर बेतलेल्या 'बघतोस काय... मुजरा कर!' या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला आहे. 

Updated: Jan 6, 2017, 03:56 PM IST
'बघतोस काय... मुजरा कर!'चा ट्रेलर रिलीज  title=

मुंबई : छत्रपती शिवाजी महाराजांच्या गड किल्ल्यांची झालेली अवस्था त्यातच शिवस्मारकाचं राजकारण या विषयावर बेतलेल्या 'बघतोस काय... मुजरा कर!' या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला आहे.

जितेंद्र जोशी, अनिकेत विश्वासरवा आणि हेमंत ढोमे हे या चित्रपटात प्रमुख भूमिकेत आहेत. तर चित्रपटाचं लेखन आणि दिग्दर्शन हेमंत ढोमेनंच केलं आहे. शिवाजी महाराजांच्या गडकिल्ल्यांचं संवर्धन करण्याऐवजी शिवस्मारकाची घोषणा आणि शिवाजी महाराजांच्या नावानं राजकारण करणाऱ्यांना या ट्रेलरमधून चपराक देण्यात आली आहे. 3 फेब्रुवारीला हा चित्रपट रिलीज होत आहे. 

पाहा 'बघतोस काय... मुजरा कर!'चा ट्रेलर