व्हिडिओ : आजवरच्या सर्वात महागड्या 'बाहुबली'चा ट्रेलर प्रदर्शित

एस एस राजमौली यांचा सिनेमा 'बाहुबली - द बिगनिंग' या सिनेमाचा बहुप्रतिक्षित ट्रेलर आज प्रदर्शित करण्यात आलाय. सिनेनिर्माता करण जोहरनं हा ट्रेलर जाहीर केलाय. 

Updated: Jun 2, 2015, 02:59 PM IST
व्हिडिओ : आजवरच्या सर्वात महागड्या 'बाहुबली'चा ट्रेलर प्रदर्शित  title=

मुंबई : एस एस राजमौली यांचा सिनेमा 'बाहुबली - द बिगनिंग' या सिनेमाचा बहुप्रतिक्षित ट्रेलर आज प्रदर्शित करण्यात आलाय. सिनेनिर्माता करण जोहरनं हा ट्रेलर जाहीर केलाय. 

या ट्रेलरमध्ये प्रभास, राणा डग्गुबाती, अनुष्का शेट्टी आणि तमन्ना यांसारखे कलाकार दिसत आहेत. देशातला सर्वात मोठा सिनेमा प्रदर्शित करताना अभिमान वाटतोय, असं यावेळी करणनं म्हटलंय. 

'बाहुबली' हा मूळ तेलगू सिनेमा हिंदी, मल्याळी, इंग्रजी आणि फ्रेंच भाषेतही प्रदर्शित होणार आहे. दोन भावांची एका साम्राज्यासाठी सुरू असलेली युद्धगाथा या सिनेमातून दाखवली आहे. सिनेमाचं शूटींग आंध्रप्रदेश, केरळ आणि महाराष्ट्रात करण्यात आलंय. हा सिनेमा पुढच्या महिन्यात प्रदर्शित होण्याची शक्यता आहे. 

व्हिडिओ पाहा :- 
 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.