बाहुबली २ने तोडले सारे रेकॉर्ड

तब्बल दोन वर्षांच्या प्रतीक्षेनंतर बाहुबली२- द कनक्लूजन हा सिनेमा शुक्रवारी भारतात रिलीज झाला. तब्बल ६५०० स्क्रीन्सवर हा सिनेमा झळकला. तज्ञांच्या मते रिलीजच्या पहिल्याच दिवशी बाहुबली२ने रेकॉर्डतोड कमाई केलीये.

Updated: Apr 29, 2017, 10:55 AM IST
बाहुबली २ने तोडले सारे रेकॉर्ड title=

मुंबई : तब्बल दोन वर्षांच्या प्रतीक्षेनंतर बाहुबली२- द कनक्लूजन हा सिनेमा शुक्रवारी भारतात रिलीज झाला. तब्बल ६५०० स्क्रीन्सवर हा सिनेमा झळकला. तज्ञांच्या मते रिलीजच्या पहिल्याच दिवशी बाहुबली२ने रेकॉर्डतोड कमाई केलीये.

या सिनेमाने १०० कोटींचा आकडा पार केल्याचा अंदाज तज्ञांनी व्यक्त केलाय. जगभरात तब्बल ९०००हून अधिक स्क्रीन्सवर हा सिनेमा दाखवलण्यात आला. 

पहिल्या वीकेंडमध्ये हा सिनेमा २५० कोटीहून अधिक कमाई करेल अशी शक्यताही तज्ञांनी वर्तवलीये. 

बुक माय शोनुसार सिनेमाचे अॅडव्हान्स बुकिंग पाहता आमिर खानच्या दंगललाही या सिनेमाने मागे टाकलेय.