शाहरुख खानच्या गाडीवर दगडफेक

गुजरातच्या अहमदाबादमध्ये बॉलीवूड अभिनेता शाहरुख खानच्या गाडीवर रविवारी दगडफेक करण्यात आली. 

Updated: Feb 14, 2016, 11:31 AM IST
शाहरुख खानच्या गाडीवर दगडफेक title=

अहमदाबाद : गुजरातच्या अहमदाबादमध्ये बॉलीवूड अभिनेता शाहरुख खानच्या गाडीवर रविवारी दगडफेक करण्यात आली. 

'रईस' या आपल्या आगामी चित्रपटाच्या शूटिंगच्या निमित्ताने शाहरुख अहमदाबादमध्ये आहे. तो शूटिंगसाठी गुजरातच्या विविध भागात जातोय. शूटिंगसाठी शाहरुख सरखेज रोजा येथे गेला होता. यावेळी काही लोकांनी त्याच्या गाडीवर दगडफेक केली. 

दरम्यान, शाहरुख त्यावेळी गाडीत नव्हता. दगडफेक करणाऱ्या व्यक्तींनी यावेळी शाहरुखविरोधात घोषणाबाजीही केली. याआधीही रईसच्या शूटिंगसाठी गुजरातच्या भुजमध्ये गेलेल्या शाहरुखला विरोधाचा सामना करावा लागला होता. ३ फेब्रुवारीला भुजच्या खारी नदीच्या किनाऱ्यावर शूटिंग होणार होती मात्र ती रद्द करण्यात आली. 

दरम्यान, दगडफेकीप्रकरणी अद्याप कोणताही गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही. असहिष्णुतेबाबत विधान केल्यानंतर शाहरुखवर टीका सुरु आहे.