'फाइन्डिंग फॅनी'तल्या अर्जुनचा हा फर्स्ट लूक...

Updated: Jul 2, 2014, 07:26 PM IST
'फाइन्डिंग फॅनी'तल्या अर्जुनचा हा फर्स्ट लूक...  title=

 

नवी दिल्ली : बॉलिवूड अभिनेता अर्जुन कपूरचा आगामी सिनेमा 'फायडिंग फॅनी' मधला फर्स्ट लूक जाहीर करण्यात आलाय. या चित्रपटात अर्जुनसोबत अभिनेत्री दीपिका पादूकोणही दिसणार आहे. 

'फायन्डिंग फॅनी'च्या निमित्तानं दीपिका-अर्जुन ही जोडी पहिल्यांदाच मोठ्या पडद्यावर एकत्र दिसणार आहे. चित्रपटाची कथा ही पाच मित्रांच्या गोवा रोड ट्रिपवर आधारित आहे, असं समजतंय. 

चित्रपट होमी अदजानिया दिग्दर्शित करत आहे. फिल्ममध्ये रणवीर सिंग कॅमियो करतानाही दिसेल. याआधी रणवीर सिंग आणि अर्जुन कपूर गुंडे या चित्रपटात एकत्र दिसले होते. या जोडगोळीचं प्रेषकांनी चांगलंच कौतूकही केलं होतं. 

अर्जुनसोबत या चित्रपचटात नसरुद्दीन शाह, डिंपल कपाडिया आणि पंकज कपूर हेदेखील प्रमुख भूमिकेत दिसतील. येत्या १२ सप्टेंबरला हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे. 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.