मुंबई : हो... मीडियामध्ये आलेल्या बातम्यांना जर खरे मानले तर बॉलिवूडचा ‘गुंडे’ फेम अर्जुन कपूर आणि ‘दबंग गर्ल’ सोनाक्षी सिन्हा एकमेकांच्या प्रेमात आहेत. अर्जुन आणि सोनाक्षी हे एकमेकांचे शेजारी आहेत तसेच दोघे जण अनेक महिन्यांपासून सुट्टी एकत्र घालवित आहेत.
अर्जुन आणि सोनाक्षीने जगापासून जरी आपले प्रेम लपवून ठेवले आहे. तरी त्यांच्या कुटुंबियांना ही काहणी माहित आहे.
अर्जुन आणि सोनाक्षीचे कुटुंब चांगले कुटुंब असून दोन्ही खूप भावनाप्रधान कुटुंब आहेत. या दोन गुणांकडे पाहिले तर अर्जुन आणि सोनाक्षीने भविष्यात मोठा निर्णय घेतला तर तो त्या दोघांसाठी चांगला असणार आहे.
ही जोडी आपल्याला लवकरच सिल्वर स्क्रिनवर दिसणार आहे. अर्जुन आणि सोनाक्षी हे दोघे अमित शर्माच्या ‘तेवर’ या चित्रपटात दिसणार आहे.
हा चित्रपट ५ डिसेंबरला रिलीज होणार आहे. हा चित्रपट अर्जुन कपूरचे वडिल बोनी कपूर आणि काका संजय कपूर निर्मित करीत आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.