अरिजीत आणि सलमानमधलं कोल्ड वॉर संपलं

सलमान खान आणि गायक अरिजीत सिंग यांच्यामध्ये गेल्या दोन वर्षांपासून सुरु असलेलं कोल्ड वॉर अखेर संपलं आहे.

Updated: Aug 21, 2016, 11:16 PM IST
अरिजीत आणि सलमानमधलं कोल्ड वॉर संपलं title=

मुंबई : सलमान खान आणि गायक अरिजीत सिंग यांच्यामध्ये गेल्या दोन वर्षांपासून सुरु असलेलं कोल्ड वॉर अखेर संपलं आहे. सलमानचा आगामी चित्रपट ट्यूबलाईटमध्ये अरिजीत गाणं म्हणणार आहे. 

डीएनए या वृत्तपत्राशी बोलताना अरिजीत सिंगनंच या वृत्ताला दुजोरा दिला आहे. मी सलमानसाठी गाणार नाही, असं कधी म्हणालोच नव्हतो, झालेला वाद विसरून आता पुढे जायला हवं असंही अरिजीत म्हणाला आहे.

सलमान आणि अरिजीत यांच्यामध्ये वाद असल्याच्या बातम्या गेल्या कित्येक दिवसांपासून येत होत्या. अरिजीत यानं त्याच्या वागणुकीबद्दल फेसबूकवरून सलमानची माफीही मागितली होती. अरिजीतनं सलमानचा ब्लॉकबस्टर चित्रपट सुल्तानसाठी जग घूमया हे गाणंही म्हणलं होतं, पण सलमानमुळेच अरिजीतनं म्हणलेलं हे गाण काढून टाकण्यात आल्याचंही बोललं गेलं.