प्रियंका, दीपिका आणि रणवीर सिंह विरुद्ध अटक वॉरंट जारी

बिहारमधील मुजफ्फरपुरच्या स्थानिक कोर्टाने दिग्दर्शक संजय लीला भंसाली तसेच दीपिका पादुकोण, प्रियंका चोप्रा आणि रणवीर सिंह या कलाकारांविरुद्ध अटक वॉरंट बजावलं आहे.

Updated: May 4, 2014, 01:08 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
बिहारमधील मुजफ्फरपुरच्या स्थानिक कोर्टाने दिग्दर्शक संजय लीला भंसाली तसेच दीपिका पादुकोण, प्रियंका चोप्रा आणि रणवीर सिंह या कलाकारांविरुद्ध अटक वॉरंट बजावलं आहे. `गोलियों की रासलीला राम-लीला` या सिनेमाच्या काही गोष्टी यासाठी कारण आहेत.
संजय लीला भंसालीचा सिनेमा `गोलियों की रासलीला राम-लीला`हा चित्रपट जरी बॉक्स ऑफिसवर खूप चालला, तरी या सिनेमाचा वाद आज देखील कोर्टात चालूच आहे. सिनेमाचे दिग्दर्शक आणि कलाकारांवर हा आरोप आहे की, त्यांनी या सिनेमातील काही दृश्यांच्या आधारे हिंदुंच्या धार्मिक भावना दुखावल्या आहेत.
फक्त याच लोकांवर नाही, तर निर्माता किशोर लुल्ला, संगीतकार आणि गीतकारांच्या विरोधात देखील वॉरंट बजावण्यात आलं आहे.
मुख्य न्यायाधिशांनी मुंबईतचे आयुक्त राकेश मारीया यांना सर्व आरोपींना अटक करून ४ जून रोजी कोर्टात हजर करण्याचे आदेश दिले आहेत. सध्यातरी मुंबई पोलिसांनी कुठलीही कारवाई केली नाही आहे. पण येणाऱ्या काळात मुंबईचे आयुक्त सर्व कलाकारांना अटक करणार का हे पहावे लागेल.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.