विराट जगाशी भांडत होता, तेव्हा अनुष्काच्या हातावर मेहंदी रंगत होती!

आयसीसी टी २० वर्ल्डकपमध्ये भारताच्या एकानंतर एक विजयामुळे भारतीयांचा ऊर अभिमानानं भरून आला. पण, या उत्साहाच्या भरात त्यांनी या विजयाचा हिरो विराट कोहली आणि अनुष्कावर अनेक जोक्स मारले आणि विराट भडकला... यानंतर त्यानं सगळ्यांना जोरदार बोलही सुनावले... पण यावेळी अनुष्का काय करत होती माहीत आहे?

Updated: Mar 29, 2016, 12:18 PM IST
विराट जगाशी भांडत होता, तेव्हा अनुष्काच्या हातावर मेहंदी रंगत होती! title=

मुंबई : आयसीसी टी २० वर्ल्डकपमध्ये भारताच्या एकानंतर एक विजयामुळे भारतीयांचा ऊर अभिमानानं भरून आला. पण, या उत्साहाच्या भरात त्यांनी या विजयाचा हिरो विराट कोहली आणि अनुष्कावर अनेक जोक्स मारले आणि विराट भडकला... यानंतर त्यानं सगळ्यांना जोरदार बोलही सुनावले... पण यावेळी अनुष्का काय करत होती माहीत आहे?

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया मॅचनंतर लोक विराटची तुलना सचिन आणि डॉन ब्रॅडमॅनसोबत करत होते... परंतु, काही लोकांनी याचा संबंध (गंमत म्हणून का असेना!) अनुष्काशी जोडला... आणि तिची टर उडवली. यामुळे, सगळा देश जेव्हा विजयाचा जल्लोष साजरा करत होता तेव्हा विराटच्या मनात काही वेगळंच चाललं होतं... आणि अनुष्काही राजस्थानच्या मंडावा जिल्ह्यात लग्नासाठी तयार होत होती.

अनुष्काच्या हातावर मेहंदी...

जेव्हा विराटनं सोशल मीडियावरून अनुष्काच्या टीकाकारांना 'शेम' म्हणत जोरदार प्रत्यूत्तर दिलं... तेव्हा अनुष्काच्या हातावर मेहंदी रंगत होती. 

दिग्दर्शक करण जोहर याच्या दिग्दर्शनाखाली 'ए दिल है मुश्किल' सिनेमाचं शुटींग इथं सुरू होतं. सोमवारी लंचनंतर शुटिंग सुरू झालं. लोकेशनवर लग्नाचा मंडप सजलेला होता... आणि सगळी टीम या सिनेमाची हिरोईन अनुष्का शर्मा हिला सजवत होती.... पाहणाऱ्यांना इथं अनुष्काचंच लग्न होतंय की काय? असं वाटत होतं.

यावेळी सिनेमासाठी काही मेहंदीचे, वरातीचे, लग्नाचे शॉटसही शूट करण्यात आले.