अखेर अमृता खानविलकरला 'नच बलिये'चं विजेतेपद

सुप्रसिद्ध डान्स रिअॅलिटी शो 'नच बलिये' च्या सातव्या सीझनचा विजेतेपद या अमृता खानविलकरने पटकावले आहे. या शोचा महाअंतिम सोहळा नुकताच पार पडला.

Updated: Jul 20, 2015, 10:48 AM IST
अखेर अमृता खानविलकरला 'नच बलिये'चं विजेतेपद title=

मुंबई : सुप्रसिद्ध डान्स रिअॅलिटी शो 'नच बलिये' च्या सातव्या सीझनचा विजेतेपद या अमृता खानविलकरने पटकावले आहे. या शोचा महाअंतिम सोहळा नुकताच पार पडला.

अमृता खानविलकर आणि हिमांशू मलहोत्रा या जोडीने हे विजेतेपद पटकावलं आहे. सीझनच्या सुरूवातीपासूनचं ही जोडी खूप चर्चेत होती. या जोडीचे परफॉर्मन्स खूपचं लोकप्रिय होते. 

'नच बलिये' चा पहिला सीझनचे विजेतेपद सचिन-सुप्रिया पिळगावकर या मराठमोळ्या जोडीने पटकावला होता. त्यानंतर नच बलियेचं विजेतेपद पटकवणारी अमृता ही दुसरी मराठी कलाकार आहे.

सातव्या सीझनमध्ये इतर स्पर्धकही बरेच लोकप्रिय होते. तसेच त्यांचे डान्स परफॉर्मन्स खूप जबरदस्त होते. त्यामुळे हे विजेतेपद कोण पटकावणार याबाबत खूप उत्सुकता होती. पण या सगळ्यात अमृता आणि हिमांशू ही जोडी अव्वल ठरली. 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.