करिनाच्या प्रेग्नेंसीवर अमृता सिंगची राजघराण्याला न शोभणारी प्रतिक्रिया

अभिनेत्री करिना कपूर-खान अर्थात 'बेबो'  प्रेग्नेंसीच्या बातम्यांमुळे चर्चेत आली आहे.

Updated: Jul 4, 2016, 11:41 PM IST
करिनाच्या प्रेग्नेंसीवर अमृता सिंगची राजघराण्याला न शोभणारी प्रतिक्रिया title=

मुंबई : अभिनेत्री करिना कपूर-खान अर्थात 'बेबो'  प्रेग्नेंसीच्या बातम्यांमुळे चर्चेत आली आहे. करीनाचा पती आणि अभिनेता सैफ अली खानने आपण 'बाबा' बनणार गोड बातमी दिली होती.

करिनाच्या प्रेग्नेंसीवर आता सैफ अली खानची पहिली पत्नी अमृता सिंग हिने वक्तव्य केलं आहे. हे वक्तव्य कदाचित सैफ अली खानला आवडणार नाही.

बॉलिवूड अभिनेत्री अमृता सिंगला जेव्हा करिनाच्या प्रेग्नेंसीबाबत प्रश्न केला गेला तेव्हा ती भडकली आणि बोलली की, 'असा प्रश्न विचारण्याची तुमची हिम्मत कशी होते. कोण आहात तुम्ही ? मला पुन्हा विचारु नका.' त्यामुळे कधीतरी राजघराण्याशी संबंधित असलेल्या अमृता सिंगची ही प्रतिक्रिया घराण्याला शोभणारी नव्हती अशी चर्चा रंगली आहे.