फिल्म रिव्ह्यू : 'अलोन'मध्ये बिप्सचा हॉरर आणि सेक्सी तडका

हा सिनेमा म्हणजे २००७ साली आलेल्या 'अलोन' या सिनेमाचा रिमेक आहे. हाच सिनेमा रोमान्स आणि हॉररसहीत पुन्हा प्रेक्षकांसमोर ठेवण्यात आलाय. 

Updated: Jan 17, 2015, 08:52 AM IST
फिल्म रिव्ह्यू : 'अलोन'मध्ये बिप्सचा हॉरर आणि सेक्सी तडका title=

 

सिनेमा : अलोन
निर्माता : कुमार मंगत
दिग्दर्शक : भूषण पटेल
गीत : कुमार
संगीत: मिथुन, जीत गांगुली, राघव सच्चर, डॉ. ज्यूस
कलाकार : बिपाशा बासू, करण सिंह ग्रोवर, जाकिर हुसैन, नीना गुप्ता
वेळ : १३२ मिनिट 

मुंबई : बॉलिवूडमध्ये हॉरर सिनेमांची फार क्रेझ दिसून येत नाही कारण असे सिनेमे हिट ठरलेले फार कमी वेळा पाहायला मिळालंय. बिपाशा बासू, करन सिंह ग्रोवर स्टारर 'अलोन' या सिनेमाकडूनही प्रेक्षकांच्या काही फार अपेक्षा नव्हत्या. बिपाशानं बॉलिवूडला स्वत:ची दखल घ्यायला भाग पाडलं असलं तरी आपली इमेज मात्र फारशा प्रभाविरित्या ती बनवू शकलेली नाहीय. त्यामुळे, एकाच प्रकारच्या साच्यातील सिनेमांसाठी एकापेक्षा जास्त दिग्दर्शकांनी तिची निवड केलीय.  

दर्शकांसमोर भीतीसोबतच रोमांचही उभा करण्याचं कसब अशा सिनेमांमधून अपेक्षित असतं... पण, थोड्या फार हॉट सिन्सच्या माध्यमातून दिग्दर्शक दर्शकांना बांधून ठेवण्याचा निष्फळ प्रयत्न करताना दिसतात... पण, हे एक फार मोठं आव्हान त्यांच्यासमोर असतं. 


'बिपाशा' दुहेरी भूमिकेत

काय आहे कथानक... 
हा सिनेमा म्हणजे २००७ साली आलेल्या 'अलोन' या सिनेमाचा रिमेक आहे. हाच सिनेमा रोमान्स आणि हॉररसहीत पुन्हा प्रेक्षकांसमोर ठेवण्यात आलाय. 

अलोन सिनेमात बिपाशा दोन जुळ्या बहिणींची भूमिकेत दिसते. संजना आणि अंजना... दोघीही लहानपणापासूनच एकमेकींना जोडलेल्या आहेत. लहानपणापासून कबीर संजनावर खूप प्रेम करतोय... आणि अंजना कबीरवर... कबीर-संजनाची प्रेमकहाणी फुलताना पाहून अंजनाचा जळफळाट होतो... तिला कबीर हवा असतो.... त्याच्यासाठी ती काहीही करायला तयार असते. 

या सोबतच सिनेमाचं कथानक पुढे सरकतं आणि भूत-आत्माचा खेळ सुरू होतो. पण, मग संजनाचा आत्मा अंजनाचा सूड घेते? हे तर सिनेमा पाहूनच तुम्हाला कळेल.. 

'बिप्स'चा सेक्सी तडका
एकाच पठडीतील सिनेमा एकापाठोपाठ दिल्यानं बॉलिवूडमध्ये बिपाशाला 'हॉरर क्वीन'चा खिताब दिला गेलाय. या सिनेमातही ती हॉरर आणि सेक्सचा तडका लावताना दिसतेय... पण, या सिनेमात तिचा तोच तोचपण पाहून प्रेक्षकही कंटाळलेत. भूषण पटेल यानं हा सिनेमा दिग्दर्शित केलाय. भूषणनं याअगोदर हॉरर फिल्म '१९२० एव्हिल रिटर्न्स' आणि 'रागिनी एमएमएस २' या सिनेमांचं दिग्दर्शन केलंय. 

हॉरर आणि वातावरणनिर्मिती...
सिनेमाचं कथानक चांगलं आहे... पुढे काय होणार? यात सिनेमाच्या शेवटपर्यंत सस्पेन्स कायम राखण्यात दिग्दर्शकाला यश आलंय. बिपाशानं आपला अभिनयही उत्तम पद्धतीनं सादर केलाय. संजना आणि अंजना या दोन्हीही भूमिका तिनं उत्तम पद्धतीनं रंगवल्यात. 

करन सिंग ग्रोवरचा पहिला सिनेमा 
टीव्ही कलाकार करन सिंग ग्रोवरनंही उत्तम अभिनय सादर केलाय. करनचा हा पहिलाच बॉलिवूड सिनेमा आहे. 'अलोन'चं संगीतही चांगलं झालंय. गाण्यांचं चित्रीकरण उत्तम पद्धतीनं सादर करण्यात आलंय. 'कतरा-कतरा' गाण्याचा यासाठी विशेष उल्लेख करावा लागेल... या गाण्याचे लोकेशन्स उत्तम आहेत. 

शेवटी काय तर...
बिपाशाचा सिनेमा असल्यानं प्रेक्षकांना सुंदर आणि हॉट सिक्वेन्स पाहायची संधी मिळते. हा हॉरर सिनेमा प्रेक्षक एकदा नक्कीच पाहू शकतील.... सोबत कॉमेडीचाही तडका आहेच... 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.