कंगना देतेय देशभक्तीचा संदेश

स्वातंत्र्यदिनानिमित्त कंगना राणावतचा देशभक्तीवर आधारित गाणे सध्या युट्यूबवर गाजतेय. या गाण्यातून भारतीय सेनेला सॅल्यूट करण्यात आलाय.

Updated: Aug 14, 2016, 03:14 PM IST
 कंगना देतेय देशभक्तीचा संदेश title=

मुंबई : स्वातंत्र्यदिनानिमित्त कंगना राणावतचा देशभक्तीवर आधारित गाणे सध्या युट्यूबवर गाजतेय. या गाण्यातून भारतीय सेनेला सॅल्यूट करण्यात आलाय.

कंगनासह अनेक लहान मुले तसेच तरुण, वृद्ध नागरिक यात दिसत आहेत. सिद्धार्थ शर्मा, पियूष वासनिक आणि यश चौहान यांनी हे गाणं गायलंय. 

तीन मिनिटांच्या या व्हिडीओमध्ये आपल्या देशावर प्रेम करा असा संदेश तिने दिलाय.