बॉलिवूडमध्ये हे काय? प्रतिस्पर्धी आलिया - श्रद्धा चक्क एकमेकींचे गातायेत गोडवे

बॉलिवूडला कॅटफाईट नवी नाही. पण यावेळी चक्क वेगळं घडलंय. एकमेकींच्या प्रतिस्पर्धी असलेल्या दोघी अभिनेत्री चक्क एकमेकींचे गोडवे गातायत. 

Updated: Jun 10, 2016, 06:46 PM IST
बॉलिवूडमध्ये हे काय? प्रतिस्पर्धी आलिया - श्रद्धा चक्क एकमेकींचे गातायेत गोडवे title=

मुंबई : बॉलिवूडला कॅटफाईट नवी नाही. पण यावेळी चक्क वेगळं घडलंय. एकमेकींच्या प्रतिस्पर्धी असलेल्या दोघी अभिनेत्री चक्क एकमेकींचे गोडवे गातायत. 

बॉलिवूडमध्ये सध्या नवा दोस्ताना फुलू लागला आहे.. कधी काळी एकमेकींचं तोंड बघण्यास उत्सुक नसलेल्या या ग्लॅमर डॉल आता मात्र एकमेकींच गुणगाण गातांना दिसत आहे. या आहेत बॉलिवूडच्या दोन बबली गर्ल आलिया भट आणि श्रध्दा कपूर.

आलिया आणि श्रध्दाची मैत्री सध्या बॉलिवूडमधील हॉट टॉपिक बनली आहे. या दोघींनी आपल्या करियरची सुरुवात बरोबरचं केली. मात्र आलियाला पहिल्या सिनेमापासूनच फेम आणि ग्लॅमर मिळालं. करण जौहरच्या प्रॉडक्शन हाऊसमध्ये बनलेल्या स्टुडंट ऑफ  द ईअर या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर शानदार यश मिळविलं. मात्र याऊलट श्रध्दाला सुरुवातीला अपयशाचाच सामना करावा लागला. कारण तिचा लव्ह का दि एन्ड आणि तीन पत्ती या सिनेमांना बॉक्स ऑफिसवर चालला नव्हता. याऊलट आलिया एकापोठापाठ एक हिट सिनेमा देत होती.

श्रध्दाच्या करियरवर फुलस्टॉप लागण्याची चिन्ह दिसत असतांना आशिकी २ प्रदर्शित झाला आणि रातोरात श्रध्दाला स्टारडम मिळालं..त्यानंतर श्रध्दानेही मागे वळून बघितलं नाही. आता या दोघीही बॉलिवूडमधील मोस्ट डिमांडींग अॅक्ट्रेस बनल्या आहेत..या दोघींमध्ये मैत्रीचं बीज फुलविण्यात वरुण धवनची महत्त्वाची भूमिका असल्याची चर्चा बीटाऊनमध्ये रंगतेय. 

आलियाने वरुण बरोबर स्टुडंट ऑफ द ईयर नंतर हम्प्टी शर्मा की दुल्हनिया या सिनेमात काम केलं होतं .तर श्रध्दानेही वरुण बरोबर एबीसीडीच्या सिक्वेलमध्ये काम केलं होतं. तसेच वरुणची या दोघींबरोबर लहानपणापासूनची मैत्री आहे..त्यामुळे वरुणऩे या दोघींमधील दुरावा मिठवला असल्याची चर्चा रंगतांना दिसतेयं.

आता तर जुडवाच्या सिक्वेलमध्येही आलिया आणि श्रध्दा या दोघींना वरुणच्या अपोझिट कास्ट करण्यात आल्याची चर्चा आहे..जुडवामध्ये सलमान खानच्या अपोझिट करिश्मा आणि रंभा या दोन नायिका होत्या. आता या सिनेमाच्या सिक्वेलमध्ये आलिया आणि श्रध्दाची जुगलबंदी रंगतांना दिसणार आहे. आलियाने सिनेमा साईन केला असून श्रध्दाकडून मात्र अजुन कन्फर्मेशन मिळालेलं नाही.
त्यामुळे या दोन्ही ग्लॅमडॉलमध्ये खरचं मैत्री झाली आहे की जुडवाच्या प्रमोशनला आतापासूनच सुरुवात झालीये हे बघणं उत्सुकतेचं ठरणार आहे.