विवियन रिचर्डच्या मुलीने पोस्ट केला आलियाचा लहानपणीचा फोटो

 इंडियन फॅशन डिझायनर मसाब गुप्ताने नुकताच इन्स्टाग्रामवर अभिनेत्री आलिया भट्टच्या लहानपणीचा फोटो पोस्ट केला आहे. 

Updated: Jun 21, 2016, 05:48 PM IST
 विवियन रिचर्डच्या मुलीने पोस्ट केला आलियाचा लहानपणीचा फोटो  title=

नवी दिल्ली :  इंडियन फॅशन डिझायनर मसाब गुप्ताने नुकताच इन्स्टाग्रामवर अभिनेत्री आलिया भट्टच्या लहानपणीचा फोटो पोस्ट केला आहे. 

२३ वर्षीय आलिया आणि मसाबा या दोन्ही जीवलग मैत्रिणी आहेत. आजही त्या खूप एकमेकांच्या जवळ आहेत. 

 

हा फोटो समुद्रकिनाऱ्यावरील असून मसाबा आणि आलिया स्वीमसूटमध्ये दिसत आहेत. 

मसाबा ही अभिनेत्री नीना गुप्ता आणि विवियन रिचर्डस यांची मुलगी आहे.