'रोबोट २' मध्ये रजनीकांतसह अक्षय

२०१० साली आलेल्या रोबोट सिनेमाने बॉक्स ऑफिसवरील सगळे रेकॉर्ड तोडले होते रजनीकांतची जबरदस्त अॅक्टिंग, अॅशच्या सौंदर्याची भूरळ आणि ए.आर.रहेमानच्या संगीताची जादू रसिकांना भूरळ घालण्यात कमालीची यशस्वी ठरली होती.

Updated: Dec 17, 2015, 03:08 PM IST
'रोबोट २' मध्ये रजनीकांतसह अक्षय title=

मुंबई : २०१० साली आलेल्या रोबोट सिनेमाने बॉक्स ऑफिसवरील सगळे रेकॉर्ड तोडले होते रजनीकांतची जबरदस्त अॅक्टिंग, अॅशच्या सौंदर्याची भूरळ आणि ए.आर.रहेमानच्या संगीताची जादू रसिकांना भूरळ घालण्यात कमालीची यशस्वी ठरली होती.

सिनेमात वापरण्यात आलेले स्पेशल इफेक्ट ही प्रभावशाली होते त्यामुळे या सिनेमाच्या सिक्वेलबद्दल सगळ्यांनाच उत्सुकता लागून राहिली होती. मात्र आता रोबोटच्या सिक्वेलवरुन पडदा उठला असून बॉलिवूडचा खिलाडी कुमार सिनेमात प्रमुख खलनायकाच्या भूमिकेत दिसणार आहे. अक्षय कुमारने नुकतचं याबातीत व्टिट केलं असून रजनीकांत, एआर रहेमान आणि सिनेमाचा दिग्दर्शक शंकर बरोबर फोटो पोस्ट केला आहे...

'वर्षाचा शेवट जबरदस्त झाला आहे....रजनीकांत सरांच्या अपोझिट मी रोबोट 2मध्ये काम करणार  असल्यामुळे मी उत्साही आहे..'असं त्यानं ट्विटरवर म्हटलंय 

सिनेमात एमी जॅक्सन प्रमुख नायिका म्हणून दिसणार असून एमीने नुकतचं अक्षय बरोबर 'सिंग ईज ब्लिंग' सिनेमात काम केलं होतं. सिनेमाचं शूटिंग मे २०१६ मध्ये सुरु होणार असून २०१७ मध्ये दिवाळीत हा सिनेमा प्रदर्शित करण्याचा निर्मात्यांचा मानस असणार आहे. 

हा सिनेमा आधीच्या रोबोटपेक्षा मोठ्या स्केलवर बनणार असून रजनीकांत आणि अक्षय कुमार या दोघांची जुगलबंदी सिनेमात रसिकांना बघायला मिळणार आहे. दोन सुपरस्टार या प्रोजेक्टशी जोडले गेल्यामुळे नक्कीच या सिनेमाकडून अपेक्षा वाढल्या आहेत..त्यामुळे सगळ्यांनाच या सिनेमाची आतुरतेने प्रतिक्षा असणार हे मात्र नक्की !