बंगळूरु विनयभंग प्रकरण, अक्षयने व्यक्त केला निषेध

नव्या वर्षाच्या स्वागतासाठी जिथे देशभरात जल्लोष होता दुसरीकडे बंगळूरुमध्ये त्याच रात्री माणुसकीला काळिमा फासणारी घटना घडली. सामान्य माणसांपासून ते बॉलीवूडपर्यंत सर्वांनीच या घटनेबाबत निषेध व्यक्त केलाय. अभिनेता अक्षय कुमारनेही तीव्र शब्दात या घटनेचा निषेध व्यक्त केलाय.

Updated: Jan 5, 2017, 01:29 PM IST
बंगळूरु विनयभंग प्रकरण, अक्षयने व्यक्त केला निषेध title=

मुंबई : नव्या वर्षाच्या स्वागतासाठी जिथे देशभरात जल्लोष होता दुसरीकडे बंगळूरुमध्ये त्याच रात्री माणुसकीला काळिमा फासणारी घटना घडली. सामान्य माणसांपासून ते बॉलीवूडपर्यंत सर्वांनीच या घटनेबाबत निषेध व्यक्त केलाय. अभिनेता अक्षय कुमारनेही तीव्र शब्दात या घटनेचा निषेध व्यक्त केलाय.

अक्षयने आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन ही प्रतिक्रिया दिलीये. यात त्याने एक सवाल देशवासियांना विचारलाय. माणूस पुन्हा अश्मयुगात जातोय आणि त्याचे वागणे पशुसारखे होत चाललेय का? खरं सागांयचं तर या घटनेनंतर स्वत:ला माणूस म्हणून घ्यायचीही लाज वाटते. बंगळूरुमध्ये घडलेल्या घटनेनंतर खरंच संताप होतोय, असं अक्षय म्हणाला. 

३१ डिसेंबरच्या रात्री बंगळूरुच्या एमजी रोडव आणि ब्रिगेड रोडवर नव्या वर्षाचा जल्लोष सुरु होता. यादरम्यान अनेक तरुणींचा विनयभंग कऱण्यात आल्याची घटना घडली.