नाना, मकरंदनंतर आता अक्षय दुष्काळग्रस्तांच्या मदतीला, ९० लाखांची मदत

बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमार दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीला धावलाय. अक्षयने मंगळवारी आपल्या मदतीच्या कार्याला सुरूवात केलीय. तो तब्बल ९० लाखांची मदत शेतकऱ्यांना करणार आहे.

Updated: Sep 16, 2015, 09:56 AM IST
नाना, मकरंदनंतर आता अक्षय दुष्काळग्रस्तांच्या मदतीला, ९० लाखांची मदत title=

मुंबई: बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमार दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीला धावलाय. अक्षयने मंगळवारी आपल्या मदतीच्या कार्याला सुरूवात केलीय. तो तब्बल ९० लाखांची मदत शेतकऱ्यांना करणार आहे.

बॉलिवूडचा हा सुपरस्टार खिलाडी मराठवाड्यातील शेतकऱ्यांना पुढील सहा महिने प्रत्येक जिल्ह्यातील ३० शेतकऱ्यांना रुपये ५० हजारांची मदत करेल.

आणखी वाचा - दुष्काळग्रस्तांना मदत करायचीय, नाना-मकरंदने जाहीर केला अकाऊंट नंबर

दुष्काळामुळं आत्महत्या केलेल्या बीड जिल्ह्यातील ३० शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना अक्षयच्यावतीने जिल्ह्याचे आयजी विश्वास नांगरे पाटील, अक्षयचा सहाय्यक वेदांत बाली ,पोलीस अधिक्षक अनिल पारस्कर, जिल्हाधिकारी नवलकिशोर राम यांच्या हस्ते मदत वाटप करण्यात आलीय. 

यापूर्वी अभिनेता नाना पाटेकर आणि मकरंद अनासपुरे हे दुष्काळग्रस्तांच्या मदतीला धावून आले आहेत. त्यांनी 'नाम' या संस्थेची स्थापना करून सामान्य नागरिकांनाही शेतकऱ्यांना मदत करण्याचं आवाहन केलंय. 

आणखी वाचा - दुष्काळग्रस्तांसाठी अजिंक्य आला धावून, ५ लाखांची मदत

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.