...या कारणामुळे अक्षय-शिल्पाचा झाला होता ब्रेकअप

अक्षय कुमार हा बॉलीवूडमधील असा स्टार आहे ज्याचे नाव अनेक अभिनेत्रींशी जोडले गेले. शिल्पा शेट्टीसोबत अक्षयचे अफेयरच्या चांगल्याच चर्चा रंगल्या होत्या. शिल्पाआधी त्याचे नाव रवीना टंडनसोबतही जोडले गेले होते. 

Updated: Jan 2, 2017, 02:18 PM IST
...या कारणामुळे अक्षय-शिल्पाचा झाला होता ब्रेकअप title=

मुंबई : अक्षय कुमार हा बॉलीवूडमधील असा स्टार आहे ज्याचे नाव अनेक अभिनेत्रींशी जोडले गेले. शिल्पा शेट्टीसोबत अक्षयचे अफेयरच्या चांगल्याच चर्चा रंगल्या होत्या. शिल्पाआधी त्याचे नाव रवीना टंडनसोबतही जोडले गेले होते. 

शिल्पा आणि अक्षय यांची पहिली भेट 199मध्ये मैं खिलाड़ी तू अनाड़ीच्या सेटवर झाली. त्यानंतर 1997मध्ये जानवर या सिनेमाच्या शूटिंगदरम्यान हे दोघं एकत्र आल्याच्या बातम्यांना उधाण आले होते.

धडकन या सिनेमात दोघांनी एकत्र काम केले होते. त्यावेळी शिल्पा आणि अक्षय लग्न करणार असल्याच्या चर्चा मिडीयमध्ये आल्या होत्या. दोघं अनेकदा एकत्र दिसत. त्यांच्यात सर्व काही चांगले सुरु होते मात्र अचानक असे काही झाले की या प्रेमकहाणीत नवे ट्विटस्ट आले. 

यादरम्यान मॅगझिनमधील बातम्यांनुसार अक्षयने शिल्पासमोर लग्नासाठी एक अट ठेवली होती. मात्र ही अट शिल्पाला मंजूर नव्हती. अक्षयने शिल्पाला लग्नानंतर करिअर सोडण्याची अट घातली होती. मात्र शिल्पाला ती अट मंजूर नव्हती. 

2000मध्ये शिल्पा आणि अक्षयचा ब्रेकअप झाला. ब्रेकअपनंतर शिल्पाने मीडियाद्वारे अक्षयविरुद्ध राग व्यक्त केला.