जर अक्षयने ती चूक केली नसती तर आज रवीना त्याची पत्नी असती

अनेकदा जीवनात अशी काही वळणे येतात ज्यामुळे ते नात्यात कायमचा दुरावा येतो. अक्षय कुमार आणि रवीना टंडन यांच्या नात्यात असेच काहीसे घडले. दोघांचे एकमेकांवर प्रेम होते. त्यांच्या प्रेमाचे किस्से सर्वत्र बोलले जात होते. दोघ लग्नही करणार होते मात्र त्या एका रात्रीने सर्वकाही बदलले.

Updated: Jun 4, 2016, 05:50 PM IST
जर अक्षयने ती चूक केली नसती तर आज रवीना त्याची पत्नी असती title=

मुंबई : अनेकदा जीवनात अशी काही वळणे येतात ज्यामुळे ते नात्यात कायमचा दुरावा येतो. अक्षय कुमार आणि रवीना टंडन यांच्या नात्यात असेच काहीसे घडले. दोघांचे एकमेकांवर प्रेम होते. त्यांच्या प्रेमाचे किस्से सर्वत्र बोलले जात होते. दोघ लग्नही करणार होते मात्र त्या एका रात्रीने सर्वकाही बदलले.

अक्षय कुमार आणि रवीना टंडन ९०च्या दशकातील उगवते तारे होते. चित्रपटात काम करण्याच्या निमित्ताने त्यांच्या भेटीगाठी होत असत. हळूहळू या भेटीगाठीचे रुपांतर प्रेमात झाले. दोघांचा मोहरा हा चित्रपट १९९४मध्ये रिलीज झाला. चित्रपट रिलीज झाल्यानंतर त्यातील टिप-टिप बरसा पानी या गाण्याने तर आग लावली. 

पडद्यावरील त्या दोघांचा रोमान्स प्रेक्षकांनाही खूप आवडला. त्यावेळी त्यांच्या प्रेमाची चर्चा सर्वत्र सुरु होती. कुठेही जाताना ते एकत्र जात. १९९६मध्ये दोघे लग्न करणार असल्याच्या अफवाही पसरल्या होत्या. 

मात्र त्यादरम्यान खिलाडियों की खिलाडीच्या शूटिंगदरम्यान अक्षय आणि रेखा जवळ आल्याच्या चर्चा रंगल्या. रवीना अक्षयच्या प्रेमाखातर करियर सोडण्यासही तयार झाली होती. अक्षय आणि रेखा यांच्या जवळीकीने रवीना आणि अक्षय यांच्यातील दुरावा वाढला. खिलाडियों का खिलाडी रिलीज झाल्यानंतर एका पार्टीत रेखा आणि अक्षय खूप वेळ एकत्र होते. ती रात्र रवीना आणि अक्षयच्या प्रेमाची अखेरची रात्र ठरली. नाहीतर कदाचित आज रवीना अक्षयची पत्नी असती.