बाबरी मशीद प्रकरणावरच्या चित्रपटात अजय देवगन?

6 डिसेंबर 1992 ला बाबरी मशीद पाडण्यात आली. यानंतर देशभरातलं वातावरण ढवळून निघालं.

Updated: Jul 8, 2016, 07:07 PM IST
बाबरी मशीद प्रकरणावरच्या चित्रपटात अजय देवगन? title=

मुंबई : 6 डिसेंबर 1992 ला बाबरी मशीद पाडण्यात आली. यानंतर देशभरातलं वातावरण ढवळून निघालं. याच प्रकरणावर आता चित्रपट येत आहे. या चित्रपटात अजय देवगन प्रमुख भूमिकेत असण्याची शक्यता आहे. 

बाहुबली आणि बजरंगी भाईजान चित्रपटाचा लेखक विजयेंद्र प्रसादनं अजयला हा रोल ऑफर केला आणि अजयलाही तो रोल आवडल्यानं त्यानं होकार दिल्याचं बोलंल जात आहे. 

विजयेंद्रच या चित्रपटाचं दिग्दर्शन करणार आहे, तर सेन्सॉर बोर्डचे अध्यक्ष पहलाज निहलानी या चित्रपटाचे निर्माते असणार आहेत. कबीर असं या चित्रपटाचं नाव असणार आहे.

बाबरी मशीद पडल्यानंतर देशातलं वातावरण आणि राजकारण कसं बदललं यावर या चित्रपटात भाष्य करण्यात आलं आहे. हा चित्रपट सरकारची बाजू घेणारा नसल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.