हा आहे बॉलीवूड चित्रपटातला सगळ्यात महागडा सीन

बॉलीवूडमधल्या सगळ्यात महाग चित्रपटाविषयी तर सगळ्यांनाच माहिती असेल, पण लवकरच येत असणाऱ्या ढिशूम या चित्रपटाचा सिक्वेन्स हा सगळ्यात महागडा असल्याचं बोललं जात आहे.

Updated: Jul 8, 2016, 06:36 PM IST
हा आहे बॉलीवूड चित्रपटातला सगळ्यात महागडा सीन  title=

मुंबई : बॉलीवूडमधल्या सगळ्यात महाग चित्रपटाविषयी तर सगळ्यांनाच माहिती असेल, पण लवकरच येत असणाऱ्या ढिशूम या चित्रपटाचा सिक्वेन्स हा सगळ्यात महागडा असल्याचं बोललं जात आहे. ढिशूम या चित्रपटामध्ये जॉन अब्राहम, वरुण धवन आणि जॅकलिन फर्नांडिस प्रमुख भूमिकेत आहेत. रोहित धवननं या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे, तर साजिद नाडियाडवाला या चित्रपटाचा निर्माता आहे. 

भारतीय बॅट्समनच्या किडनॅपिंगची या चित्रपटाची कहाणी आहे. किडनॅप केलेल्या बॅट्समनला सोडवण्यासाठी एक स्पेशल टीम बनवण्यात येते. यामध्ये स्पेशल टास्क ऑफिसर कबीर शेरगिल म्हणजेच जॉन अब्राहम आणि जुनैद अन्सारी म्हणजे वरुण धवन बॅट्समनचा शोध घेतात. 

या बॅट्समनला शोधण्यासाठी दोघांना 36 तास लागतात. या चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये हा सीन दाखवण्यात आला आहे. हा अॅक्शन सीन जमीन, पाणी आणि हवेतून शूट करण्यात आला आहे. 

या सीनमध्ये हॉट व्हील्स, स्पीडबोट आणि हेलिकॉप्टरचाही वापर करण्यात आला आहे. हा सीन तब्बल 12 मिनीटं दाखवण्यात येणार आहे. बॉलीवूड चित्रपटामधला इतिहासातला हा सगळ्यात मोठा आणि सगळ्यात कठीण सीन असल्याचं बोललं जात आहे.  

मॉस्कोमध्ये हा सीन शूट करण्यात आला आहे. या सीनसाठी विदेशी क्रू मेंबर, फायटर यांचा समावेश करण्यात आला. जॉन आणि वरुणच्या हेलिकॉप्टरमधल्या स्टंटना शूट करण्यासाठी अनेक हेलिकॉप्टरचा वापर करण्यात आला. ढिशूम हा चित्रपट 29 जुलैला रिलीज होत आहे. या चित्रपटातून अक्षय खन्ना कमबॅक करत आहे. 

ढिशूमचा ट्रेलर