मनसेच्या पाकिस्तानी कलाकारांबद्दलच्या भूमिकेला अजय-अतुल यांचा पाठिंबा

उरी हल्ल्यानंतर पाकिस्तानविरोधात देशातील लोक आक्रमक झालेत. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने पाकिस्तानी कलाकारांनी 48 तासांमध्ये भारत सोडून जावं अन्यथा जिथे आहात तिथे चोप देऊ असा धमकीवजा इशारा दिलाय.

Updated: Sep 24, 2016, 06:27 PM IST
मनसेच्या पाकिस्तानी कलाकारांबद्दलच्या भूमिकेला अजय-अतुल यांचा पाठिंबा title=

मुंबई : उरी हल्ल्यानंतर पाकिस्तानविरोधात देशातील लोक आक्रमक झालेत. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने पाकिस्तानी कलाकारांनी 48 तासांमध्ये भारत सोडून जावं अन्यथा जिथे आहात तिथे चोप देऊ असा धमकीवजा इशारा दिलाय.

मनसेच्या या भूमिकेला संगीतकार अजय-अतुल यांनी पाठिंबा दिला आहे. भारतामध्ये अनेक चांगले कलाकार आहेत, त्यांना संधी देण्यात यावी असं आवाहन अजय-अतुल यांनी केलं आहे.

संयुक्त राष्ट्र संघांच्या मंचावरून नवाज शरीफ यांनी भारतावर केलेल्या आरोपांनंतर झी समूह जिंदगी या चॅनलवरील पाकिस्तानी कार्यक्रम बंद करण्याच्या विचारात आहेत.

शरिफांचं युनोतील वक्तव्य दुर्दैवी असल्याचं एस्सेल समुहाचे चेअरमन डॉ. सुभाषचंद्रा यांनी म्हटलंय. त्यामुळे आम्ही जिंदगी या चॅनलवरील पाकिस्तानी कार्यक्रम बंद करण्याच्या विचारात आहोत अशी प्रतिक्रिया डॉ. सुभाष चंद्रा यांनी ट्विटरच्या माध्यमातून दिलीये.