मुंबई : 'हॅपी न्यू इअर'मध्ये अभिषेक बच्चननं केलेला नागिन डान्स प्रेक्षकांच्या चांगलाच पसंतीस उतरलेला दिसतोयच... पण, त्याच्या या 'नागिन डान्सचा फिव्हर' त्याची पत्नी ऐश्वर्या राय - बच्चनवरही चढलाय.
आता ऐश्वर्याही आपला आनंद 'नागिन डान्स' करून सेलिब्रेट करताना दिसतेय. त्याचं झालं असं की, नुकतंच अभिषेकच्या फुटबॉल टीमनं एक मॅच जिंकली होती. ही मॅच पाहण्यासाठी अभिषेक आणि ऐश्वर्या दोघेही हजर होते.
ही मॅच अभिषेकच्या टिमनं नोंदवली आणि अभिषेक-ऐश्वर्याच्या आनंदाला पारावार उरला नाही. आपला आनंद व्यक्त करण्यासाठी ऐश्वर्यानं 'नागिन डान्स' केला... हा नागिन डान्स तिनं खास करून तिच्या पतीसाठी अभिषेकसाठी केला...
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.