फिल्मफेअरच्या कव्हरपेजवर अशी दिसेल ऐश्वर्या

बॉलीवुड अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चनच्या सौंदर्याची देशभरात चर्चा आहे. दरवर्षाप्रमाणे कान्स फिल्म फेस्टिवलमध्ये ऐश्वर्याची झलक पाहायला मिळावी, म्हणून गर्दी झाली.

Updated: May 18, 2016, 06:07 PM IST
फिल्मफेअरच्या कव्हरपेजवर अशी दिसेल ऐश्वर्या title=

मुंबई : बॉलीवुड अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चनच्या सौंदर्याची देशभरात चर्चा आहे. दरवर्षाप्रमाणे कान्स फिल्म फेस्टिवलमध्ये ऐश्वर्याची झलक पाहायला मिळावी, म्हणून गर्दी झाली.

कान्स फिल्मने फिल्मफेअर मॅगझीनसाठी जुनच्या आवृत्तीसाठी ऐश्वर्याचं फोटोशूट केलं, यात ऐश्वर्या खूपच सुंदर दिसत होती, फोटोशूटमध्ये तिने रंग-बिरंगी फुलांचा ड्रेस घातला होता.

कान्स फिल्म फेस्टिवलमध्ये रविवारी सरबजित चित्रपटाची स्क्रिनिंग झाली, यात ४२ वर्षाच्या ऐश्वर्या राय बच्चनने परपल लिपस्टिक लावल्याने ती चर्चेत आली. सरबजित हा चित्रपट २० मे रोजी रिलीज होणार आहे.

ऐश्वर्या चित्रपटात सरबजितची बहिण दलबीर कौरची भूमिका पार पाडणार आहे.