मुंबई : अभिनेता आदित्य पांचोलीने जिया खानच्या आईवर 100 कोटींचा मानहानीचा दावा दाखल केलाय. शुक्रवारी मुंबई हायकोर्टात हा दावा दाखल करण्यात आला.
जियाने आत्यहत्या केली नसून तिचा खून करण्यात आल्याचं जियाच्या आईचा आरोप आहे.. राबिया खान यांनी ट्विटवर अर्वाच्च भाषेत विधानं केल्याने इंडस्ट्रीमध्ये असलेल्या आमच्या प्रतिष्ठेला धक्का बसल्याचं आदित्य पांचोली यांचं म्हणणं आहे. आणि त्या विरोधातच त्यांनी राबिया खानवर 100 कोटींचा मानहानीचा दाव दाखल केलाय.
याआधी या प्रकरणात संशयित म्हणून जियाचा बॉयफ्रेण्ड आणि आदित्य़ पांचोलीचा मुलगा सुरज पांचोलीलाही अटक करण्यात आली होती... आदित्या पांचोलीने दाखल केलेल्या या दाव्यामुळे जिया खान आत्महत्या प्रकरण आता आणखी नवीन वळण घेणार आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.