मुंबई : बॉलिवूडची हॉट तारका मल्लिका शेरावत हिने ट्विटवर एक जुने छायाचित्र अपलोड केलेय. यावेळी तिने लिहिले आहे, हा फोटो माझ्या लहानपणीचा आहे. त्यावेळी मी गावात राहत होते.
मल्लिका ही फोटोमध्ये गावातील छोरी दिसत आहे. तिने डोक्यावर ओढणी घेतलेली दिसत आहे. सिनेमात येण्याआधी मल्लिका हरियाणामधील एका लहान गावात राहत होती. जाट कुटुंबात मल्लिकाचा जन्म झालाय. तिने मूळ नाव रिमा लांबा आहे.
बॉलिवूडमध्ये तिने आपली ओळख मल्लिका शेरावत केली. शेरावत मल्लिकाच्या आईचे आडनाव आहे. मल्लिकाला हिंदी सिनेमात येण्यासाठी पाठिंबा दिला. त्यामुळे मल्लिकाने आपल्या आईचे आडनाव आपल्या नावासोबत जोडले आहे.
Pic frm my childhood in the village:) pic.twitter.com/69CTSLUra5
— Mallika Sherawat (@mallikasherawat) March 9, 2015
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.