मुंबई : ज्या सिनेमाची सिनेचाहते अतूरतेने वाट बघत आहे तो बाहुबली सिनेमा लवकरच प्रदर्शित होणार आहे. 'बाहुबली-2'बाबत सध्या सगळीकडेच चर्चा आहे. पण या सिनेमाबाबत एक गोष्ट अशी समोर आली आहे की या सिनेमामध्ये अभिनेता प्रभास डबल रोलमध्ये दिसणार आहे.
'बाहुबली-2'मध्ये प्रभास एकीकडे शिवुडू (महेंद्र बाहुबली) च्या भूमिकेत आहे ज्यामध्ये त्याचं वजन 86 से 88 किलो आहे तर दूसरीकडे बाहुबली (अमरेंद्र बाहुबली)ची भूमिका दिसणार आहे. ज्यामध्ये त्याचं 105 किलो आहे. यासाठी अभिनेता प्रभासने मिस्टर वर्ल्ड असलेल्या लक्ष्मण रेड्डीकडून खास ट्रेनिंग घेतलं आहे आणि दोन वेळा त्याचं वजन वाढवलं आणि कमी केलं आहे.
रेड्डींचं म्हणणं आहे की, बाहुबलीच्या रुपात प्रभासला जास्त मांसपेशी वाढवण्याची गरज होती. तर मुलाच्या भूमिकेत त्याला मांसपेशी कमी करण्याची गरज होती. ४ वर्षात अशा प्रकारे शारीरिक बदल करणे प्रभाससाठी थोडं अवघड होतं.