युवराज - हेझलचं चाहत्यांसाठी सरप्राईज...

टीम इंडियाचा क्रिकेटर युवराज सिंग आणि त्याची 'बलिए' अर्थात त्याची पत्नी अभिनेत्री हेजल किच लवकरच आपल्या चाहत्यांना एक सरप्राईज देणार आहेत. 

Updated: Mar 22, 2017, 11:39 PM IST
युवराज - हेझलचं चाहत्यांसाठी सरप्राईज...  title=

मुंबई : टीम इंडियाचा क्रिकेटर युवराज सिंग आणि त्याची 'बलिए' अर्थात त्याची पत्नी अभिनेत्री हेजल किच लवकरच आपल्या चाहत्यांना एक सरप्राईज देणार आहेत. 

'नच बलिए' या पॉप्युलर डान्सिंग रिअॅलिटी शोच्या आठव्या सीझनमध्ये युवराज - हेझल ही जोडी आपल्याला दिसणार आहे. 

युवराज-हेझल यांना एकत्र डान्स करताना पाहताना त्यांच्या चाहत्यांना नक्कीच आनंद होईल. वाईल्ड कार्डच्या माध्यमातून ही जो़डी या कार्यक्रमात थिरकणार आहे. 

युवराज-हेझल यांचा विवाह गेल्या वर्षी मोठ्या थाटामाटात पार पडला होता.