कमल हसन यांच्या पायाला दुखापत

दक्षिणेकडचे प्रसिद्ध अभिनेते कमल हसन यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलेय. कमल हसन यांच्या पायाला दुखापत झाल्याने त्यांना उपचारासाठी दाखल करण्यात आलेय.

Updated: Jul 14, 2016, 11:42 AM IST
कमल हसन यांच्या पायाला दुखापत title=

मुंबई : दक्षिणेकडचे प्रसिद्ध अभिनेते कमल हसन यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलेय. कमल हसन यांच्या पायाला दुखापत झाल्याने त्यांना उपचारासाठी दाखल करण्यात आलेय.

ऑफिसच्या पायऱ्या उतरत असताना त्यांचा पाय घसरला. यामुळे त्यांच्या पायाला दुखापत झाल्याने त्यांच्यावर अपोलो रुग्णालयात उपचार सुरु आहेत. 

दरम्यान, कमल हसन यांची प्रकृती उत्तम असून काळजी करण्याचे कारण नसल्याचे हसन यांच्या जवळच्या व्यक्तींने सांगितले. 

हसन यांनी चाची ४२०, दशावतार, सदमा यासारख्या चित्रपटातून आपल्या अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकून घेतलीत.