मुंबई : बॉलीवुडचा ज्युनियर बी अर्थात अभिषेक बच्चननं आपला नवा फ्लॅट खरेदी केलाय. मुंबईतल्या वरळी भागातील 'स्कायलार्क' या ३७ मजली टॉवरमध्ये अभिषेकनं हा फ्लॅट खरेदी केलाय.
वरळीच्या अॅनी बेझंट रोडवर स्कायक्लार्क टॉवरमध्ये अभिषेकचा हा फ्लॅट आहे. ३८७५ चौरस फूट या फ्लॅटची किंमत ४१ कोटींहून अधिक असल्याचं सांगण्यात येतेय. म्हणजेच, प्रति चौरस फूट १ लाख ६ हजार अशी याची किंमत अभिषेकला मोजावी लागल्याचं समजतंय.
'ओअॅसिसि रिअॅलिटी'च्या माध्यमातून वरळीत ६७ मजल्यांचे दोन टॉवर उभे राहिल्याचं दिसतंय. सुधाकर शेट्टी आणि विकास ओबेरॉय हे दोन बांधकाम व्यावसायिक या प्रोजेक्टवर काम करतायत.
कागदपत्रांतून मिळालेल्या माहितीनुसार, अभिषेकनं या फ्लॅटसाठी २.०५ कोटी रुपये स्टॅम्प ड्युटी भरलीय. तर, एकूण किंमतीत क्लब हाऊससाठी २५ लाख आणि ३५ लाखांचा विकासनिधी भरल्याचाही उल्लेख आहे.
अभिषेकचा हा फ्लॅट म्हणजे अभि-अॅशचं ड्रीम हाऊस असल्याचं सांगितलं जातंय. यामध्ये, पाच बेडरुम, एक फॅमिली रुम, एक डायनिंग रुम, लिव्हिंग रुम, वेट आणि ड्राय किचन तसंच चारही बाजुंना २० फुटांची गॅलरी आहे.
या फ्लॅटमध्ये अभिषेक - ऐश्वर्या अमिताभ - जयासोबत राहायला येतात की नाही, याची अनेकांना उत्सुकता लागलीय. तसा, अभिषेकनं हा फ्लॅट केवळ गुंतवणुकीच्या दृष्टीने विकत घेतलाय की त्याला स्वत:ला राहण्यासाठी याचं उत्तर मात्र गुलदस्त्यातच आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.