गीता फोगटच्या लग्नात सहभागी होणार आमिर

बॉलीवूड अभिनेता आमिर खान भारताची कुस्तीपटू गीता फोगट हिच्या लग्नात सहभागी होणार आहे. आमिरच्या आगामी दंगल या सिनेमात आमिरने गीता फोगटचे वडील महावीर फोगट यांची भूमिका केलीये.

Updated: Nov 5, 2016, 01:43 PM IST
गीता फोगटच्या लग्नात सहभागी होणार आमिर title=

मुंबई : बॉलीवूड अभिनेता आमिर खान भारताची कुस्तीपटू गीता फोगट हिच्या लग्नात सहभागी होणार आहे. आमिरच्या आगामी दंगल या सिनेमात आमिरने गीता फोगटचे वडील महावीर फोगट यांची भूमिका केलीये.

आमिर खान आणि दिग्दर्शक नितेश तिवारी हे दोघेही गीता फोगटच्या लग्नात हजेरी लावणार आहे. गीताचे लग्न हरियाणाच्या चरखी दादरी येथे 20 नोव्हेंबरला होणार आहे.

ताज्या रिपोर्टनुसार, गीताचे वडील महावीर फोगट यांनी आपल्या मुलीच्या लग्नासाठी आमिर आणि नितेश तिवारी यांना आमंत्रण दिले होते. या दोघांनी हे आमंत्रण स्वीकारल्याची माहिती मिळत आहे. सुवर्णपदक विजेती गीता फोगट कुस्तीपटू पवन कुमारशी लग्न करणार आहे.