'पीके'ने रचला इतिहास, ३०० कोटींचा टप्पा ओलांडला

मिस्टर परफेक्शनिस्ट आमीर खानच्या पीके सिनेमाने या रविवारीही जोरदार प्रतिसाद मिळाला आहे, 

Updated: Jan 5, 2015, 03:08 PM IST
'पीके'ने रचला इतिहास, ३०० कोटींचा टप्पा ओलांडला title=

मुंबई : मिस्टर परफेक्शनिस्ट आमीर खानच्या पीके सिनेमाने या रविवारीही जोरदार प्रतिसाद मिळाला आहे, पीकेवर आतापर्यंत प्रेक्षकांकडून ३०० कोटी रूपयांच्यावर प्रेमाचा पाऊस झाला आहे. फारच कमी दिवसात पीके चित्रपटाचा गल्ला ३०० कोटी रूपयांचा टप्पा पार करू शकला. शनिवारपर्यंत २७८ कोटी रूपयांचा गल्ला पीकेने जमवला होता, आता हा आकडा ३०० कोटी रूपयांच्या वर गेला आहे.

 बॉलिवूडमध्ये मिस्टर परफेक्शनिस्ट अशी ओळख असलेल्या आमीर खानच्या ‘पीके‘ या चित्रपटाने बॉलिवूडमधील कमाईचे सर्व विक्रम मोडीत काढले आहे. ‘पीके‘ या चित्रपटाने आतापर्यंत २७८.५२ कोटी रुपयांची कमाई केली आहे.

आमीर खानच्या यापूर्वीच्या थ्री एडियएटस, धूम थ्री, या चित्रपटांनी देखिल २०० कोटी रूपयांपेक्षा अधिक व्यवसाय केला होता. पीके हा चित्रपट १९ डिसेंबर रोजी प्रदर्शित झाला आतापर्यंत या चित्रपटाने ३००  कोटी जमवले आहेत. थ्री एडियएट्स हा २०० कोटी जमवणारा पहिला चित्रपट होता.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.