मुंबई : मॉडेल आणि अभिनेत्री गौहर खान हिला भर कार्यक्रमात थोबाडात मारण्याची घटना खूपच गाजली होती... याच घटनेला आता एक नवं वळणं मिळालंय.
पाटणाचा रहिवासी असलेल्या ज्युनिअर आर्टिस्ट आणि आरोपी मोहम्मद अकील यानं आता ही घटना सगळी अगोदरपासून प्लान केली होती, असं म्हटलंय. गौहर खाननंच आपल्याला भर कार्यक्रमात थोबाडात मारण्यासाठी लालूच दाखवली होती... याच्या बदल्यात 'दबंग ३' या सिनेमात एक भूमिकाही मिळवून देऊ, अशी लालूच तिनं आपल्याला दाखवली होती. याअगोदर आपण गौहर खानला ओळखतही नव्हतो... असं मोहम्मदनं म्हटलंय.
हे सगळं गौहरनं पब्लिसिटी मिळवण्यासाठी केलंय, असाही आरोप मोहम्मदनं केलाय.
भर कार्यक्रमात स्टेजवर चढून गौहर खानला थोबाडीत मारणाऱ्या मोहम्मदनं त्यावेळी, कमी कपडे परिधान केल्यानं आपण गौहरला थोबाडीत मारली, असं म्हटलं होतं...
व्हिडिओ पाहा -
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.