या ७ बॉलिवूड कलाकारांकडे नाही भारताचं नागरिकत्व

बॉलिवूडचा अॅक्टर अक्षय कुमार याला काही दिवसांपूर्वी लंडनमध्ये एअरपोर्टवर रोखण्यात आलं कारण त्याच्याकडे व्हिसा नव्हता. पण जेव्हा कळालं की अक्षय या कॅनडाचा नागरिक आहे त्यानंतर त्याला सोडण्यात आलं.

Updated: Apr 8, 2016, 10:17 PM IST
या ७ बॉलिवूड कलाकारांकडे नाही भारताचं नागरिकत्व title=

मुंबई : बॉलिवूडचा अॅक्टर अक्षय कुमार याला काही दिवसांपूर्वी लंडनमध्ये एअरपोर्टवर रोखण्यात आलं कारण त्याच्याकडे व्हिसा नव्हता. पण जेव्हा कळालं की अक्षय या कॅनडाचा नागरिक आहे त्यानंतर त्याला सोडण्यात आलं.

बॉलिवूडमध्ये असे अनेक कलाकार आहेत ज्यांच्याकडे भारताचं नागरिकत्व नाही किंवा ज्यांनी इतर देशांचं नागरिकत्व स्विकारलं आहे.

१. आलिया भट्ट : आलिया ही ब्रिटिश नागरिक असल्याने तिच्याकडे ब्रिटेनचा पासपोर्ट आहे. भारतात आलियाला मतदान करण्याचा म्हणून मतदान करण्याचा अधिकार देखील नाही.

२. इमरान खान : इमरान खानकडे देखील अमेरिकेचं नागरिकत्व आहे. इमरानचा जन्म हा अमेरिकेत झालाय आणि त्याने अनेक दिवस अमेरिकेत काढले आहेत.

३. दीपिका पदुकोण : प्रसिद्ध बॅडमिंटन खेळाडू प्रकाश पदुकोण यांची मुलगी दीपिका पदुकुनचा जन्म हा डेन्मार्क मध्ये झाला. काही दिवसांनंतर मात्र ते बँगलुरु येथे आले.

४. कॅटरिना कॅफ : कॅटरिना कॅफकडे देखील ब्रिटेनचं नागरिकत्व आहे. कॅटरिना ही भारतात कामाच्या निमित्त मिळणाऱ्या वीजावर राहत आहे.

५. जॅकलीन फर्नाडिज : माजी मिस श्रीलंका राहिलेली जॅकलीनकडे देखील भारताचं नागरिकत्व नाही. ती 
देखील नोकरीसाठी मिळणाऱ्या वीजावर राहत आहे. 

६. नरगिस फाकरी : नरगिस फाकरीचे पिता हे पाकिस्तानी आहेत. नरगिसकडे देखील भारताचं नागरिकत्व नाही.