बिग बॉस 8: तिसरा दिवस - नॉमिनेशन आणि जेवणासाठी राजकारण सुरू

सिक्रेट सोसायटीच्या सदस्यांनी सर्व प्रवाशांना सांगितले की, त्यांचा 'कुर्बानी' टास्क आता संपला आहे. सर्वजण आनंदी झाले आणि 'ब्लू है पानी-पानी... और दिन भी सनी सीनी' या गाण्यावर डान्स करून सेलिब्रेशन केले. आता घरात पाण्याचा सप्लाय पण सुरू झालाय. एवढंच नाही तर तिसऱ्याच दिवशी बिग बॉसमध्ये नॉमिनेशन आणि जेवणासाठी राजकारण सुरू राजकारण आणि फ्लर्टिंगही सुरू झालंय.

Updated: Sep 25, 2014, 07:16 PM IST
बिग बॉस 8: तिसरा दिवस - नॉमिनेशन आणि जेवणासाठी राजकारण सुरू title=
नवी दिल्ली : सिक्रेट सोसायटीच्या सदस्यांनी सर्व प्रवाशांना सांगितले की, त्यांचा 'कुर्बानी' टास्क आता संपला आहे. सर्वजण आनंदी झाले आणि 'ब्लू है पानी-पानी... और दिन भी सनी सीनी' या गाण्यावर डान्स करून सेलिब्रेशन केले. आता घरात पाण्याचा सप्लाय पण सुरू झालाय. एवढंच नाही तर तिसऱ्याच दिवशी बिग बॉसमध्ये नॉमिनेशन आणि जेवणासाठी राजकारण सुरू राजकारण आणि फ्लर्टिंगही सुरू झालंय.
या विमानात डायंड्रा आणि गौतम यांनी टाइम स्पेंड करून ऐकमेकांसोबत फ्लर्ट करत होते. त्यांच्या प्रेमाचा रंग हा चढतच जाताना आपल्या दिसत आहे.
नॉमिनेशनची प्लॉनिंग सुरू -
 
दुसरीकडे करिश्मा आणि आर्य बब्बर हे या आठवड्यात होणाऱ्या इविक्शनची प्लानिंग करत होते. करिश्माने उघडपणे सांगितले की, मी येथे फ्रेंड्स बनविण्यासाठी आली नाही. गेम खेळण्यासाठी आलीय. दोघंही ऐकमेकांना नॉमिनेशन करणार नसल्याचे त्यांनी ठरविले आहे. या व्यतिरिक्त ती उपेनबद्दल बीचिंग करताना दिसून आली. त्यांची ही मैत्री किती दिवस टिकून राहिल, हे दिसेलच...
 
बिझनेस क्लाससाठी सोनी आणि प्रणित -

तिसऱ्या दिवशी विमानातील सर्व प्रवाशांसाठी चांगला दिवस होता. कारण कुर्बानी टास्कपासून त्यांची सुटका झाली. त्यानंतर सीक्रेट सोसायटीच्या सदस्यांनी सांगितले की, कोणत्या तरी दोन प्रवाशांना बिझनेस क्लासमध्ये पाठविण्याचे ठरविले आहे. सर्व प्रवाशांनी त्यांच्यापैकी दोघांना निवडले. सर्व सदस्यांनी सोनी सिंह आणि प्रणित यांचे नाव सिलेक्ट केले.

स्वयंपाक घरात राजकरण सुरू-
 
 
 
सीक्रेट सोसायटीने प्रवाशांना त्याच्या आवडीचे जेवण बनविण्यासाठी स्वयंपाक घर दिले आहे. यात त्यांनी फक्त एक आठवड्यचा किरणा माल दिला आहे. बिग बॉसमध्ये जास्त करून भांडणे हे जेवणावरून होताना आपल्या दिसून आले आहेत. स्वयंपाक घर दिल्यानंतर सोनी सिंग आणि करिश्मा तन्ना यांनी यावर कब्जा केला आहे. आता पुढे पाहुया की, अजून काय घडणार आहे. 
सीक्रेट सोसायटीच्या सदस्यांचा पर्दा फाश -
 
 
 
अभिनेत्री दीपशिखा, डायरेक्टर पुनित इस्सार आणि आरजे प्रीतम हे सीक्रेट सोसायटीचे सदस्य होते. त्यांचा पर्दाफाश झाल्यानंतर सुद्धा यांचा हुकूम प्रवाशांवर चालणार आहे.
वोटिंगसाठी फक्त 24 तास -
 
पुढील काळात अजून एक ट्विस्ट आपणास पाहायला मिळेल. गेल्यावर्षीच्या सिझनमध्ये वोटिंगसाठी पूर्ण पाच दिवस मिळत होते. यावर्षी तुमच्या आवडत्या प्रवाशांच्या वोटिंगसाठी फक्त 24तास मिळणार आहे.  या आठवड्यात सलमान येवून ज्या प्रवाशांना सर्वात कमी वोट मिळेल. त्याला बिग बॉसचं घर सोडावं लागणार आहे. 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.