मुंबई : तुम्ही आतापर्यंत वजन कमी करण्याच्या घटना ऐकल्या असतील पण वजन वाढवण्याच्या घटना कमीच ऐकायला मिळतात. एका 8 वर्षाच्या मुलाने त्याच्या पित्याचा जीव वाचवण्यासाठी एका महिन्यात 11 किलो वजन वाढवलं. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की या मुलाने असं का केलं ?
चीनमधल्या जियांग्झूमधील साओ ली या व्यक्तीला ल्युकेमिया या आजार झाला आणि त्याहूनही वाईट गोष्ट म्हणजे संपूर्ण चीनमध्ये आवश्यक असणारे स्टेम सेल नाही मिळाले. असा परिस्थितीत त्यांचा मुलगाच त्यांना स्टेम सेल डोनेट करु शकतो. पण या दरम्यान त्याचं वय आणि वजन खूप कमी होतं.
डॉक्टरांनी म्हटलं की, जर मुलाचं वजन 45 किलोच्या वर असेल तर तो ते डोनेट करु शकतो. या दरम्यान मुलाचं वय हे 35 किलो होतं. त्यामुळे त्याने वजन वाढवण्यासाठी खाण्यात बदल केला आणि एका महिन्यात 46.5 किलो वजन वाढवलं.
वजन वाढल्यानंतर डॉक्टरांनी मुलाचं बोन मॅरो म्हणजेच अस्थिमज्जाचा भाग काढून त्याच्या वडिलांध्ये ट्रांसप्लांट केला आणि त्यांचा जीव वाचला. वडील आणि मुलगा दोन्ही व्यवस्थित आहेत आणि आता मुलगा पुन्हा वजन कमी करण्याचा प्रयत्न करतोय.