जगातील सर्वात महागडे कंडोम

 व्हेनेझुला या देशात सेफ सेक्स लोकांच्या खिशाला चाट लावणारे ठरत आहे. या देशात गर्भपात बेकायदा आहे, एचआयव्हीचा धोका वाढतोय तसेच तरूणींमध्ये गर्भधारणेची समस्या वाढते आहे, त्यामुळे कंडोम हे सर्वात महाग गोष्ट झाली आहे. 

Updated: Feb 23, 2016, 09:38 PM IST
जगातील सर्वात महागडे कंडोम title=

व्हेनेझुला :  व्हेनेझुला या देशात सेफ सेक्स लोकांच्या खिशाला चाट लावणारे ठरत आहे. या देशात गर्भपात बेकायदा आहे, एचआयव्हीचा धोका वाढतोय तसेच तरूणींमध्ये गर्भधारणेची समस्या वाढते आहे, त्यामुळे कंडोम हे सर्वात महाग गोष्ट झाली आहे. 

या ठिकाणी ३६ कंडोमच्या एका पाकिटासाठी ४७६० बोलिवार्स म्हणजे सुमारे ५०० पाउंड आहे. हा देश कॅथलिक देश आहे. 

जागतिक स्तरावर तेलाच्या किंमती घसरल्याने या देशातील घरगुती वस्तूच्या किंमती आकाशाला भिडल्या आहेत. 

 


घरगुती वस्तू घेण्यासाठी लागलेली रांग...

व्हेनेझुला देशातून एकूण निर्यातीतून ९५ टक्के हिस्सा हा तेल निर्यातीचा आहे. त्यामुळे सेफ सेक्ससाठी लोकांना खिशाला भुर्दंड पडत आहे.