मुंबई : मोबाईल चाहत्यांना त्याची किंमतीचा फरक पडत नाही. पण आम्ही अशा एका फोनची किंमत सांगणार आहोत की ती ऐकल्यावर तुम्ही चक्रावून जाल....
या फोनची किंमत तब्बल सहा कोटी रुपये आहे. हो तुम्ही ६ कोटीच रुपये वाचले आहे. हा फोन आयफोन ५ ब्लॅक डायमंड आहे. याचा आणि अॅपल कंपनीचा काही संबंध नाही.
हा फोन वर्ल्ड फेमस गॅजेट डिझायनर स्टुअर्ट ह्यूजने आपल्या काही खास कस्टमर्ससाठी बनविला आहे. स्टुअर्टने या फोनच्या डिझाइनसाठी दुर्लभ आणि अत्यंत किमती हिऱ्यांचा वापर केला आहे. हा फोन पूर्णपणे हँडमेड आहे. हा फोन बनविण्यासाठी कोणत्याही प्रकारच्या मशीनचा वापर करण्याता आलेला नाही.
अशा प्रकारचा एक फोन बनविण्यासाठी आणि त्याला सजविण्यासाठी २ महिन्यांचा कालावधी जातो. हा फोन बनविण्यासाठी स्टुअर्टला खूप मेहनत घ्यावी लागते. ह्युज प्रथम आयफोनला पूर्णपणे उघडतो आणि त्याला ब्लॅक डायमंडने सजवतो.
तो लक्झरीला टेक्नॉलॉजीशी जोडण्यात विश्वास ठेवतात. गेल्या काही दिवसापूर्वी २४ कॅरेट सोन्याचा एक मोबाईल फोन बनविला आहे. हा फोन खूप प्रसिद्ध झाला होता.
ह्यूज म्हटले, फोनची किंमत इतकी असली तरी त्याची खरेदी करणाऱ्यांची कमतरता नाही.
कोण आहेत स्टुअर्ट ह्यूज
स्टुअर्ट ह्यूज इंग्लडचे सुप्रसिद्ध गॅजेट डिझायनर आहेत. एका विशिष्ट वर्गासाठी अशा प्रकारचे गॅजेटची ते निर्मिती करतात. स्टुअर्ट म्हणणे आहे की, त्याला लक्झरी आणि टेक्नॉलॉजीचे मिश्रण करण्यात खूप मजा येते.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.