दुबईत तयार होते सर्वात लांब सोन्याची साखळी

जगातील सर्वात लांब सोन्याची चैन संयुक्त अरब अमिरात येथे तयार होत आहे. याची लांभी ५ किलोमीटर असणार आहे. तसेच त्याचे वजन १८० किलो ग्रॅम असणार आहे. ही सोन्याची चैन २२ कॅरेट सोन्यातून बनणार आहे. या सोन्याची साखळीच्या माध्यातून दुबई गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये आपले नाव नोंदवू पाहत आहे. ही बातमी गल्फ न्यूजने दिली आहे. 

Updated: Nov 25, 2014, 07:38 PM IST
दुबईत तयार होते सर्वात लांब सोन्याची साखळी title=

दुबई : जगातील सर्वात लांब सोन्याची चैन संयुक्त अरब अमिरात येथे तयार होत आहे. याची लांभी ५ किलोमीटर असणार आहे. तसेच त्याचे वजन १८० किलो ग्रॅम असणार आहे. ही सोन्याची चैन २२ कॅरेट सोन्यातून बनणार आहे. या सोन्याची साखळीच्या माध्यातून दुबई गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये आपले नाव नोंदवू पाहत आहे. ही बातमी गल्फ न्यूजने दिली आहे. 

ही चैन दुबई शॉपिंग फेस्टिव्हल अंतर्गत तयार केली जात आहे. यासाठी दुबई गोल्ड अँड ज्वेलरी ग्रुपने सांगितले की, चार मोठ्या ज्वेलर्सने हाथ मिळवणी केली आहे. यात मलाबार गोल्ड अँड डायमंड्स, सिरोया, स्काई ज्वेलर्स आणि ज्वेल वन यांचा समावेश आहे. 

या साखळीला दुबई सेलिब्रेशन चैन असे नाव दिले आहे. तसेच ही दुबई शॉपिंग फेस्टिव्हलच्या २० व्या जयंती निमित्त प्रदर्शित करण्यात येणार आहे. हे फेस्टिव्हल १ जानेवारी ते १ फेब्रुवारी या दरम्यान चालणार आहे. 
या चैनचे वैशिष्ट्य म्हणजे यात उपक्रमात ज्याला भाग घायचा आहे, ते यासाठी सोने देऊ शकतात. फेस्टिव्हल संपल्यानंतर त्या व्यक्तीला त्याचे सोने चैन कट करून दिले जाईल. तसेच याच्या बदल्यात तो एक ब्रेसलेटही घेऊ शकतो. 

ही चैन बनविण्यासाठी ७० कारागीर काम करीत आहेत. ते दररोज १० तास काम करतात. ही चैन २०० मीटर लांब जागेवर प्रदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. या चैनची देखरेख दुबई पोलीस आणि ट्रान्सपोर्ट विभागाची मदत घेतली जात आहे. 

 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.