मुंबई : एका सायकलने जगातील सर्वात जलद धावणाऱ्या फऱारीला हरवले, असे कसे झाले, हे शक्यच नाही. फेकू मीडिया... काही पण न्यूज देतात.... अशा प्रतिक्रिया तुम्ही फेसबूकवर टाकाल. पण हो हे शक्य झाले आहे.
साधारणतः एक सायकल जास्त जास्त ताशी १०० किलोमीटरच्या वेगाने धावेल असा तुम्ही अंदाज लावू शकतात. पण फ्रान्समध्ये अशी सायकल बनविण्यात आली तिने विश्व विक्रमी ताशी ३३३ किलोमीटरचा वेग घेतला आणि फरारीला माघारी टाकले.
एक सामान्य माणसाचे वाहन म्हणून सायकलकडे पाहिले जाते. पण अशी एक सायकल बनविण्यात आली की जगातील सर्वात फास्ट कारही त्याच्या स्पीडसमोर किरकोळ वाटेल.
फ्रेच सायकलिस्ट फ्रेंकोइस जिस्सी यांनी ताशी ३३३ किलोमीटरच्या वेगाने रॉकेट सायकलच्या माध्यमातून फरारीला मागे टाकले जिस्सीने आपल्या सायकलला रॉकेल लावले होते. त्यामुळे या सायकलने फरारीला मागे टाकले.
दरम्यान जिस्सी याने स्वतःचे रिकॉर्डही तोडले आहे. ताशी ३३३ किलोमीटर म्हणजे ताशी २०७ मैलच्या वेगाने नवा रेकॉर्ड बनविला आहे. त्याने हा रेकॉर्ड़ दक्षिण फ्रान्सच्या पाऊ रिकर्ड ट्रॅक सर्किटवर बनविला आहे.
सर्वात आश्चर्याची गोष्ट म्हणजे ही एक सामान्य सायकल होती. त्याला तीन रॉकेट लावण्यात आले. त्यात हायड्रोजन पेरॉक्साईड भरण्यात आले होते.
जेव्हा फरारी कार सोभत जिस्सीने आपल्या सायकलची रेस लावली तेव्हा त्याने ६५० हॉर्सपॉवरची फरारी ४३० स्कूडेरियाची निवड केली होती. रेस सुरू झाली तेव्हा सायकलने फरारीला एकदम मागे सोडले.
हा व्हिडिओ यूट्यूबवर जिस्सीने अपलोड केला. ९ नोव्हेंबरला हा व्हिडिओ अपलोड करण्यात आला. त्यानंतर त्याला १ कोटींपेक्षा अधिक लोकांनी पाहिले आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.