जगातील सर्वात मोठ्या ब्लू डायमंडचा १४१ कोटींना लिलाव

जगातील सर्वात मोठी निळा हीरा (ब्लू डायमंड) क्रिस्टीनं जिनेव्हा इथं लिलावात दोन कोटी ३७ लाख ४० हजार डॉलर म्हणजेच १४१ कोटी २४ लाख रुपयांना विकला गेला. १३.२२ कॅरेटच्या या हिऱ्याचं नाव ‘द ब्लू’ आहे.

Aparna Deshpande Aparna Deshpande | Updated: May 21, 2014, 08:32 PM IST

www.24taas.com, वृत्तसंस्था, जिनेव्हा
जगातील सर्वात मोठी निळा हीरा (ब्लू डायमंड) क्रिस्टीनं जिनेव्हा इथं लिलावात दोन कोटी ३७ लाख ४० हजार डॉलर म्हणजेच १४१ कोटी २४ लाख रुपयांना विकला गेला. १३.२२ कॅरेटच्या या हिऱ्याचं नाव ‘द ब्लू’ आहे.
नुकताच १०० कॅरेटचा एक पिवळा हिरा १ कोटी ३० लाख डॉलरला विकला गेला होता. त्याच्याही आधी नोव्हेंबर महिन्यात क्रिस्टीनं एक ऑरेंज हिऱ्याचा लिलाव केला होता, ज्यासाठी एका ग्राहकानं ३ कोटी ५५ लाख डॉलर दिले होते.
सध्या रंगीत हिऱ्यांची बाजारात खूप मागणी आहे. पहिले रंगीत हिरे पांढऱ्या हिऱ्यांपेक्षा स्वस्त असायचे. मात्र आता रंगित हिऱ्यांची मागणी वाढलेली आहे आणि ते खूप महागडेही झालेत.
मिळालेल्या माहितीनुसार अमेरिकेतील ज्वेलर्स हॅरी विनस्टननं हा निळा हिरा विकत घेतलाय. क्रिस्टीनं हा हिरा म्हणजे जगातील सर्वात मोठा हिरा असल्याचं म्हटलंय. मात्र त्यानं हा हिरा विकणाऱ्याचं नाव सांगितलं नाही. याला सर्वात उत्कृष्ट अशा हिऱ्यांच्या श्रेणीत ठेवलं गेलं. आता विक्रीनंतर हिऱ्याचं नाव बदलून ‘विंस्टन ब्लू’ ठेवलं जाणार आहे. हिरा नासपत्तीच्या आकाराचा आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.