www.24taas.com, वॉशिंग्टन
भारतातील काळा पैसा बाहेरच्या देशात नेला जात आहे. समाजसेवक अण्णा हजारे, बाबा रामदेव आणि अरविंद केजरीवाल यांनी काळ्या पैशाबाबद आंदोलन केले. मात्र, काळ्या पैशाबाबत काहीही झाले नाही. जगात भारतचा काळ्या पैशाच्याबाबतीत आठवा क्रमांक लागतो. तर या टॉप ट्वेंटीत समावेश होणारा भारत हा एकमेव दक्षिण आशियायी देश आहे.
२०१० या वर्षात १.६ अब्ज डॉलर (सुमारे ८,७२0 कोटी रुपये) एवढा काळा पैसा भारतातून परदेशात नेण्यात आलाय. ही बाब `ग्लोबल फिनान्शियल इंटेग्रिटी` (जीएफआय) या संस्थेने प्रसिद्ध केलेल्या एका अहवालामुळे उघड झालीय. १० विकसनशील देशांमध्ये भारताचा आठवा क्रमांक लागतो, असे `ग्लोबल’ या संस्थेने म्हटले आहे.
दरम्यान, भारत सरकारने मध्यंतरी संसदेत काळ्या पैशावर श्वेलतपित्रका सादर केली, त्यात याच संस्थेच्या याआधीच्या अहवालातील आकडेवारी नमूद केली गेली होती. या दशकात १२३ अब्ज डॉलर व स्वातंत्र्यापासून २०१० पर्यंत सुमारे २३२ अब्ज डॉलर एवढा काळा पैसा भारताबाहेर नेण्यात आला. याच काळात भारतीयांनी जमा केलेल्या अवैध मालमत्तांचे मूल्य सुमारे ४८७ अब्ज डॉलर असावे, असा अंदाज आहे.
जागतिक आर्थिक उदारीकरण आणि मुक्त अर्थव्यवस्थेनंतर काळा पैसा वाढाला लागला. १९९१ ते २००८ या काळात भारतात काळा पैसा गोळा केला. हाच काळा पैसा परदेशात दडवून ठेवण्यास गती आली, असेही या अहवालात नमूद केले गेले आहे.
काळ्या पैशामुळे चीनचे २७४० अब्ज डॉलरचे नुकसान झाले आहे. मेक्सिकोला ४७६ अब्ज डॉलरचा तर मलेशियाला २८५ अब्ज डॉलर आणि सौदी अरेबियाला २०१ अब्ज डॉलरचा फटका बसला आहे. रशियाला काळ्या पैशामुळे १५२ अब्ज डॉलरचे तर, फिलिपीन्सला १३८ अब्ज डॉलरचे नुकसान झाले आहे.