उडत्या विमानात महिलेचा आत्महत्येचा प्रयत्न

चीनमध्ये एका महिलेने उडत्या विमानाचा दरवाजा उघडून आत्महत्येचा प्रयत्न केल्याची घटना समोर आलीये. इतकेच नव्हे तर दोन अन्य प्रवासी महिलांनी असे करण्यात तिची मदत केल्याचेही समोर आलेय.

Updated: Jan 6, 2016, 05:00 PM IST
उडत्या विमानात महिलेचा आत्महत्येचा प्रयत्न  title=

नवी दिल्ली : चीनमध्ये एका महिलेने उडत्या विमानाचा दरवाजा उघडून आत्महत्येचा प्रयत्न केल्याची घटना समोर आलीये. इतकेच नव्हे तर दोन अन्य प्रवासी महिलांनी असे करण्यात तिची मदत केल्याचेही समोर आलेय.

बीजिंग कॅपिटल एअरलाईन्सच्या विमानात ही घटना घडली. विमानातील कर्मचाऱ्यांनी मोठ्या मुश्किलीने त्यांना समजावण्याचा प्रयत्न केला. मात्र त्या महिलेने विमानात स्वत:ला संपवण्याची धमकी दिली. 

अखेर विमान लँड झाल्यानंतर या तीनही प्रवाशांना अटक करण्यात आली. सुरक्षेला धोका निर्माण केल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आलाय.